मेकॅनिक डिझेल या व्यवसायामध्ये विद्यार्थ्याला इंजिन विषयी परिपूर्ण माहिती दिली जाते . या माहितीद्वारे विद्यार्थीला कंपनीमध्ये कामाची संधी उपलब्ध होते . तसेच याचा दुसरा फायदा म्हणजे जर विद्यार्थ्याला कंपनीमध्ये काम करावयाचे नसेल तरीसुद्धा विद्यार्थी हा कमी जागेमध्ये कमी भांडवलामध्ये स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो .याचबरोबर विद्यार्थीला संस्थेतर्फे चार चाकी गाडी शिकवली जाते व लर्निंग लायसन्स काढून दिले जाते.